Asia Cup : पाकिस्तानने आता श्रीलंकेला दिली धमकी

Kiran Mahanavar

आशिया चषक 2023 च्या यजमानपदाचा वाद वाढतच चालला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आशिया कप 2023 चे यजमान पद जवळपास गेले आहे.

आशिया कप श्रीलंकेत खेळवण्याच्या जोरदार हालचाली एशियन क्रिकेट काऊन्सिलने सुरू केल्या आहेत.

मात्र या सर्व घडामोडीमुळे बिथरलेल्या पाक बोर्डाने श्रीलंका क्रिकेट संघटनेलाच धमकी देण्याचा प्रयत्न केला.

पाक बोर्डाने श्रीलंकेसोबची द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे.

आशिया कप 2023 चे आयोजन श्रीलंकेने आपल्या देशात करण्यामध्ये रस दाखवला आहे.

त्यामुळे आता पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या संबंधामध्ये कटूता आली आहे.

पीसीबीने श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणारी वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढच्या सर्कलनुसार या वर्षी जुलै महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत जायचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.