PCB vs BCCI : इसमें तेरा घाटा... पाकिस्तानला मोठा धक्का?

अनिरुद्ध संकपाळ

आशिया कप वाद

आशिया कप पाकिस्तानात खेळवायचा की नाही याबाबत अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात वाद सुरू आहे.

भारताचा स्पष्ट नकार

भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर तोडगा म्हणून पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव दिला होता. मात्र बीसीसीआयने तोही नाकारल्याचे वृत्त आहे.

पाकच्या सारख्या धमक्या

पाकिस्तान सारखं सारखं भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी देत आहे.

पाकला मोठा झटका

आता तर बीसीसीआय सारखे नखरे करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने पाकिस्तानशिवायच आशिया कप खेळण्याचे प्लॅनिंग केले आहे.

टेलिग्राफचा रिपोर्ट

टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार आशिया कपमधील इतर संघ पाकिस्तानशिवाय आशिया कप खेळण्यास तयार आहेत.

आशिया कप श्रीलंकेत

एशिया क्रिकेट काऊन्सिलने श्रीलंकेत आशिया कपचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानला जर आशिया कपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना श्रीलंकेत खेळावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.