तारा सुतारियाचा आज बर्थडे आहे.
१९ नोव्हेंबर १९९५ चा तिचा जन्म असून सौंदर्यवती गायिका-अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आहे.
मुंबईतील पारशी कुटुंबात तिचा जन्म झाला आहे.
डिस्ने इंडियाच्या 'बिग बडा बूम' या चित्रपटातून तिनं गायिका म्हणून आपल्या करियला सुरुवात केली.
द सूट लाईफ ऑफ करण आणि कबीर आणि ओये जस्सी या सिनेमात तिनं भूमिकाही साकारली आहे.
स्टुडंट ऑफ दि इयर २ मध्येही तिनं महत्वाची भूमिका साकरली.
या सिनेमासाठी तीनं झी सिने अॅवॉर्डमध्ये 'बेस्ट फिमेल डेब्यू' हा पुरस्कारही पटकावला होता.
त्यानतंर तिनं मरजावा, तडप, हिरोपंती २ आणि इक विलन रिटर्न्समध्येही भूमिका साकारली.