Beauty tips : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी असा करा टॉमेटोचा वापर

नमिता धुरी

टॉमेटो हा क जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. यामुळे चेहऱ्याचे तेज वाढते आणि डाग निघून जातात.

Beauty tips

टॉमेटो आणि मध लावल्यास चेहऱ्याची छिद्रे मोकळी होतात व स्वच्छ होतात.

Beauty tips

या दोन्हींची पेस्ट तयार करून ती १० मिनिटे चेहऱ्यावर लावा. असे आठवड्यातून २-३ वेळा करा.

Beauty tips

गुलाबपाणी आणि टॉमेटो यांमुळे चेहऱ्यावरील डाग जातात.

Beauty tips

टॉमेटोच्या बियांचा रस काढून घ्या आणि त्यात गुलाबपाणी घाला. हे मिश्रण रात्री झोपताना चेहऱ्याला लावा.

Beauty tips

टॉमेटोची साल आणि साखर यांमुळे त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होईल.

Beauty tips

टॉमेटोच्या सालांवर साखर लावून त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर फेस पॅक लावा.

Beauty tips

तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर टॉमेटो लावल्यापूर्वी त्वचातज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beauty tips