Stress : तणावाला मिनिटात 'छू' करणारे चॉकलेट

सकाळ डिजिटल टीम

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना चॉकलेट खाण्यास आवडते.

साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अति सेवनामुळे याचा शरिरावर विपरित परिणाम होऊ शकतो.

डार्क चॉकलेटच्या सेवनाुमळे ह्रदय, त्वचा आणि तणावापासून आराम मिळण्यास मदत होते.

डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. गरोदरपणात याचे सेवन केल्याने रॅडिकल्सपासून रक्षण होण्यास मदत होते.

डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन नावाचे रसायन असते. ज्यामुळे तणाव होण्यास आणि मन शांत होण्यास मदत होते.

ज्या महिला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डार्क चॉकलेटचे सेवन करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.

डार्क चॉकलेटमध्ये एंडोर्फिन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती डार्क चॉकलेटचे मर्यादित प्रमाणात सेवन करतात, त्यांची त्वचा तरूण आणि निरोगी राहते. डार्क चॉकलेटमुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.