Akanksha Dubey : प्रेमात धोका की दुसर काही...मृत्यूचं गुढ कायम

सकाळ डिजिटल टीम

सध्या मनोरंजन विश्वाला ग्रहण लागल्याचं दिसत आहे.

Akanksha Dubey

साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूड अनेक महान कलाकार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातुन बाहेर निघत नाही तेच आता आता भोजपुरी सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.

Akanksha Dubey

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली ज्यानंतर सर्वच कलाकार धक्क झाले आहे.

Akanksha Dubey

अभिनेत्री आकांक्षा दुबे हिनं आत्महत्या केली आहे. शूटिंगनंतर ती हॉटेलमध्ये गेली आणि तिथे आत्महत्या केली.

Akanksha Dubey

बनारसमधील सारनाथ हॉटेलमध्ये तिनं तिचं जीवन संपवलं आहे. बनारसमध्येच ती तिच्या एका प्रोजेक्टचं शूटिंग करत होती.

Akanksha Dubey

आकांक्षाने हे पाऊल का उचललं या मागच कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Akanksha Dubey

हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक असे काय झाले? असे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. लवकरच याची माहिती मिळेलं.

Akanksha Dubey

आकांक्षा दुबेबद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म 1997 मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला.

Akanksha Dubey

2019 मध्ये 'मेरी जंग मेरा फैसला' या चित्रपटातून आकांक्षाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यात तिची छोटीशी भूमिका होती.

Akanksha Dubey

त्यानंतर आकांक्षाने 'मुझसे शादी करोगी' आणि 'साजन' सारखे चित्रपट केले. आकांक्षा दुबेला नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती.

Akanksha Dubey

ती टिकटॉकपासून इंस्टाग्रामपर्यंत खूप सक्रिय होती. आकांक्षा दुबे अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि रील इन्स्टाग्रामवर शेअर करत असे. आत्महत्येच्या एक दिवस आधीही आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akanksha Dubey