महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते.
पण तुम्हाला माहिती आहे का टॅलेंटेड आणि सतत चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीसांकडे किती संपत्ती आहे?
२०१९मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीत सादर झालेल्या एफीडिएटनुसार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची आणि पत्नीची स्थावर आणि जंगम मालमत्तेचे डिटेल्स दिले होते.
अमृता फडणवीस यांच्याकडे ९९.३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या निवडणूकीत निवडणूक आयोगाला त्यांची एकूण संपत्ती जवळपास पावणे दोन लाख सांगितली होती.
पण त्यांची पत्नी अमृता यांच्याजवळ जवळपास साडे चार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अमृता फडणवीस या त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा श्रीमंत आहे.
अमृता या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
फडणवीसांच्या पत्नी या व्यतिरिक्त त्यांनी एक स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.