मानलं 'या' अभिनेत्रींना, चक्क आमिरला केलेलं रीजेक्ट...

प्रणाली मोरे

आमिर सध्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज आधीच वादात पडल्यामुळे सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात आमिरनं माझी चूक माफ करा म्हणत लोकांना लाल सिंग चड्ढा पाहण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

Esakal

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिरला पाहिलं जातं. आमिरसोबत काम करायला मिळणं कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्वप्न असेल. पण बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी आमिर खानसोबत काम करायला चक्क नकार कळवला होता.

Esakal

प्रियंका चोप्राला आमिरच्या 'गझनी' सिनेमात काम करायची ऑफर मिळाली होती. पण भूमिकेत काही दम नाही म्हणत प्रियंकानं नकार कळवला होता. नंतर ती भूमिका असिनला मिळाली अन् असिन रातोरात बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाली.

Esakal

कंगना रनौत ही बॉलीवूडची अशी अभिनेत्री आहे जिनं आमिरच काय तर शाहरुख,सलमान सोबत काम करायलाही नकार दिला होता. 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये तिने याविषयी खुलासा केला होता.

Esakal

ऐश्वर्याला आमिर सोबत 'राजा हिंदुस्थानी' मध्ये काम करण्याची संधी खूप लवकर चालून आली होती. पण त्यावेळी आपण लहान होतो आणि आपल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं हे सांगून तिनं सिनेमाला नकार दिल्याचं एकदा ऐश्वर्या म्हणाली होती. त्यानंतर करिश्मा कपूरनं ती भूमिका साकरली आणि बॉलीवूडची सुपरस्टार झाली.

Esakal

काजोलनं आमिरसोबत 'फना' सिनेमात काम केलं आहे,आणि त्यांची केमिस्ट्री लोकांना आवडली देखील होती. पण याच काजोलनं आमिरसोबत थ्री इडियट्समध्ये काम करायला नकार दिला होता. पुढे ती भूमिका करिना कपूरनं साकारली आणि तिनं खूप प्रशंसा देखील मिळवली.

Esakal

आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते आमिरच्या लाल सिंग चड्ढाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनकडे. तब्बल ४ वर्षांनी आमिर खान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पाहूया, प्रेक्षक कसं स्वागत करतायत मि. परफेक्शनिस्टचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal