CET परिक्षेला जाताय? या गोष्टी विसरू नका,नाहीतर परिक्षेला मुकाल

| Sakal

CET च्या परिक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे.

| Sakal

या परीक्षेतील ‘पीसीएम ग्रुप’ची परीक्षा नऊ ते १४ मेदरम्यान आणि ‘पीसीबी ग्रुप’ची परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.

| Sakal

मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांचीही परीक्षा केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली.

| Sakal

अनेक महिन्यांपासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात.

| Sakal

त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांवरही ताण असतो. परीक्षेसाठी जाताना आवश्यक त्या गोष्टींचे नियोजन आतापासूनच करायला हवे.

| Sakal

परीक्षेसाठी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशपत्र.

| Sakal

उमेदवारांनी प्रवेशपत्र अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी.

| Sakal

प्रवेशपत्र, आवश्यक लेखन साहित्य आणि पाण्याची बॉटल जवळ ठेवा

| Sakal

प्रवेशपत्रावरून परीक्षेची तारीख, वेळ, केंद्राचा पत्ता आदी काळजीपूर्वक पाहावे

| Sakal

परीक्षा केंद्राचे मुख्यद्वार बंद होण्याच्या वेळेपूर्वी पोचण्याचे नियोजन करावे

| Sakal

पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट आदी ओळखपत्र सोबत ठेवावीत

| Sakal

दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे

| Sakal

प्रवेशपत्रावरील सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे पालन करावे

| Sakal