सध्या चैत्र नवरात्री सुरू असून एक महिन्यांनी गुरु आणि राहू हे मेष राशीत गुरु चांडाल योग करत आहेत.
२२ एप्रिलला गुरु मेष राशीत गोतर करत आहे. तिथे आधीच राहू असल्याने हा गुरू चांडाल योग तयार होत आहे.
३० ऑक्टोबरला राहू मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल त्यावेळी हा योग संपेल. तोपर्यंत या ३ राशींसाठी सतर्कतेचा इशारा आहे.
या योगातले ६ महिने मेष राशीसाठी फार जड असणार त्यांना अनेक अडचणी, त्रास, मनस्तापाला सामोरे जावे लागणार.
आर्थिक संकट येऊ शकतं, आरोग्याविषयी समस्या उद्भवू शकतील. हा काळ कठीण ठरू शकतो.
मिथून राशीच्या लोकांना या काळात अशुभ बातमी मिळू शकते. आर्थिक नुकसान, आरोग्याविषयीच्या समस्या येतील.
कामावरचा ताण वाढू शकतो. स्वभाव चीडचीडा होऊ शकतो. घईगडबडीत निर्णय घेणे टाळा.
धनु राशीच्या व्यापारी लोकांना समस्या येऊ शकते. मोठं नुकसान होऊ शकतं. देवाण-घेवाणीचे व्यवहार साभाळून करा.
वाहन चालवताना सावधान रहा. अपघाताची शक्यता आहे. खर्च वाढून आर्थिक बाजू कमकूवत होऊ शकते.