ज्वारी बाजरी पासून बनणाऱ्या भाकरी पोळी पेक्षा अधिक पौष्टिक असतात.
मुळात गहू पित्तकरी असून ज्वारी-बाजरीमध्ये क्षारही असतात त्यामुळे आरोग्यासाठी भाकरी अधिक चांगले असतात.
शिवाय चपातीमध्ये साखरेचे प्रमाण ज्वारी-बाजरी पेक्षा जास्त असते म्हणून मधुमेहाच्या रूग्णांना डॉक्टर चपाती ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात.
बाजरीमध्ये ओमेगा-3 नावाचा घटक असतो यामुळे हार्टशी संबंधित आजार, मधुमेह संधिवात आजार दूर होतात.
बाजरीची भाकरी खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
ज्वारीचे भाकर खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते.
ज्वारीची भाकर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.
नाचणीच्या भाकरीत कॅल्शियम आणि प्रोटिनचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होतात.