धर्मवीर संभाजी राजेंबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

| Sakal

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जन्म पुरंदर किल्ला येथे १४ मे १६५७ झाला होता.

| Sakal

 संभाजी राजे हे अत्यंत हुशार होते. त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, तसेच संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

| Sakal

संभाजी महाराज गडावर बसून राज्यकारभार करण्यातले नव्हते. त्यांनी रणांगणात उतरत असंख्य वेळा शत्रूविरोधात जोरदार लढाई केली.

| Sakal

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारात निपूण आणि कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.

| Sakal

युध्दात शत्रूविरोधात गनिमी काव्याचा जोरदार वापर करत त्यांनी शत्रूंना धूळ चारली. त्यांच्या युध्द या कौशल्याच्या जोरावर त्यांनी शत्रुंना झुंजवत ठेवलं.

| Sakal

संभाजी राजेंच्या परक्रमाबद्दल बोलावे तितके कमी पडेल.राजेनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत.

| Sakal

१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला करत राजेंना पकडलं.

| Sakal

औरंगजेबाने केलेले अत्याचार ४० दिवस सहन केल्यानंतर फाल्गुन अमावास्येला संभाजी महाराजांची प्राणज्योत मालवली.

| Sakal