CM शिंदेंचं साताऱ्यात जंगी स्वागत; 50 जेसीबींद्वारे ताफ्यावर पुष्पवृष्टी, क्रेननं घातला पुष्पहार

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री शिंदे सातारा दौऱ्यावर

सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी प्रथमच सातारा दौऱ्यावर आले.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळं दुरूस्तीनंतर ते पुन्हा पाटणकडं रवाना झाले.

कार्यकर्त्यांचा उत्साह कायम

पण, सकाळी १०.३० चा कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरू झाला. मात्र कार्यक्रम ४ तास उशिरा सुरु होऊनही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.

शासन आपल्या दारी अभियान

सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

अनेक आमदार व मान्यवर उपस्थित

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार,पालकमंत्री शंभूराज देसाई ,नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक आमदार व मान्यवर उपस्थित होते.

पाटणमध्ये जय्यत तयारी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाची पाटणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. हेलिकॉप्टर कार्यस्थळावर उतरताच त्यांचे शासकीय अधिकारी यांनी स्वागत केले.

50 जेसीबीच्या बकेटमधून पुष्पवृष्टी

त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई व इतरांनी स्वागत केले. त्यानंतर ५० वर जेसीबीच्या बकेट मधून पुष्पव्रष्टी करीत त्यांचं स्वागत केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde Grand Reception in Patan