कपल्स त्यांच्या लग्नानंतरच्या हनीमूनला आणखी आनंदी बनवण्यासाठी मालदीवला जाण्याची पसंती दर्शवतात.
मात्र तुम्हालाही हे जाणून मोठा झटका बसू शकतो की सर्वाधिक घटस्फोट मालदीवमध्येच होतायत.
असे सांगण्यात येते की येथील मासे पकडणारे लोक लग्न केल्यानंतर यात्रेवर निघताच लग्न मोडून टाकायचे.
मालदीव सध्या असा देश आहे जेथे सर्वाधिक घटस्फोटाचे प्रमाण आहे.
या छोट्याशा देशात घटस्फोटाचे वाढते प्रमाण खरंच चिंतेचा विषय बनला आहे. येथील घटस्फोटामागे काय कारण आहे तुम्हाला माहितीये का?
समुद्री यात्रा
येथील समुद्री यात्रेवर जाणारे लोक यात्रेवरून परतणार की नाही कधी परतेल यांचा त्यांनाच अंदाज नसतो. अशात त्यांच्या पार्टनरसोबत परतल्यानंतर ते वेळ घालवू शकतील की नाही हे त्यांना माहिती नाही.
तसेच येथील शरिया कायद्यामुळे पुरुषांसाठी घटस्फोट घेणे फार सोपे झाले आहे ज्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालले आहे.
माहितीसाठी इतर देशांच्या तुलनेत मालदीवमध्ये लग्न करणंही फार सोपं आहे.
वर्ष २००० मध्ये या देशातून धक्कादायक आकडा पुढे आलाय. इथे ४००० हजार लग्नांवर २००० घटस्फोट झाल्याचे आढळून आले.