Horoscope 15 December 2025: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

मिथुन :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह :

काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

तुळ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

धनु :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मकर :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कुंभ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल उत्तम राहील.

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.