तुझ्यात जीव रंगला मालिकेतून वहिनीसाहेब म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर
धनश्रीने सोशल मिडियावर नुकतंच एक फोटोशूट पोस्ट केलं आहे. या फोटोशूटची सध्या सगळीकडे चर्चा आहे
मुंबईतल्या जुहू बीचवर धनश्रीने हे फोटोशूट केलं असून धनश्रीच्या या फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
धनश्रीची घायाळ करणारी अदा आणि आकर्षक नजर तिच्या फॅन्सना तिच्या प्रेमात पाडतेय
६ एप्रिल १९८८ ला पुण्यात धनश्रीचा जन्म झाला. झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मधून धनश्री पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली
धनश्रीने गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ, तुझ्यात जीव रंगला, माझीया प्रियाला प्रीत कळेना अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय
धनश्रीने अनेक डान्स रिऍलिटी शो मध्ये सुद्धा भाग घेऊन तिच्या डान्सची चुणूक दाखवली आहे
धनश्रीने पुण्यात इंजिनियर असलेल्या दुर्वेश देशमुख सोबत लग्न केलं. २०२१ ला दोघांना मुलगा झाला.