धुळ्यात गारपीटीचा कहर, रस्त्यांवर गारांचा खच - Hailstorm

| Sakal

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.

| Sakal

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील खोरी टीटने भागात ही गारपीट झाली आहे.

| Sakal

आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

| Sakal

धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

| Sakal

दुपारपासून गारपिटीसह साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.

| Sakal

जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

| Sakal

यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

| Sakal

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली

| Sakal

या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचे दिसून येत आहे.

| Sakal

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातात तोंडाशी आलेला घास हिरवल्या गेल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

| Sakal

शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे

| Sakal