अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करूनही चेहऱ्यावर तेज दिसत नसेल तर आहाराकडे लक्ष देणे हाच एक पर्याय आहे.
कामाचा ताण, बदललेली आहारशैली, प्रदूषण या कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते.
वाढत्या वयानुसार आहारात काही बदल होणे आवश्यक आहे.
हळद घातलेले दूध अॅण्टिबॅक्टेरियल, अॅण्टिव्हायरल, अॅण्टिबायोटिक असते.
कोमट दुधात हळद आणि काळी मिरी पावडर घालून प्या.
अंजीरमधील कॅल्शिअम आणि फायबरमुळे हाडे मजबूत होतात व विष्ठा बाहेर टाकण्यास मदत होते.
१-२ अंजीर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी खा.
लिंबाच्या रसामुळे त्वचा पुनरुज्जीवित होते व मधामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाते.
कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या.