वजन कमी करणं कठीण असेल पण ते वाढवणं सोपं आहे. फक्त आहारात काही पदार्थांचा समावेश नक्की करा.
दिवसातून १-२ उकडलेली अंडी खाल्ल्यास शरीराला प्रथिने मिळतात.
दिवसातून १०० ते १५० ग्रॅम मटण किंवा चिकन खा.
आठवड्यातून दोन वेळा १०० ते १५० ग्रॅम मासे खा.
व्यायाम केल्यानंतर दूध प्यायल्याने स्नायूंचा विकास चांगला होतो.
रोज ५० ते १०० ग्रॅम पनीर खा.
सुका मेवासुद्धा वजन वाढवायला मदत करेल.
आहारातील छोटासा बदल तुम्हाला सुदृढ शरीर देऊ शकतो.