थंडीत सोलवटलेल्या त्वचेवर लावण्याशिवाय पेट्रोलियम जेलीचे आणखीही उपयोग असतात.
दुतोंडी केसांची समस्या सोडवण्यासाठी त्यावर हे जेली लावू शकता.
जिथे पर्फ्युम मारायचा असेल तिथे आधी पेट्रोलियम जेली लावा. यामुळे पर्फ्युम दिवसभर टिकून राहील.
हिवाळ्यात ओठ सुकत असतील तर त्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही याचा उपयोग होईल.
भुवयांचे केस गळत असतील आणि त्वचा कोरडी पडत असेल तर भुवयांवर पेट्रोलियम जेली लावा.
कपड्यांवर लिपस्टिकचा डाग लागल्यास पेट्रोलियम जेलीमध्ये बेकींग सोडा घालून ते मिश्रण डागावर लावा आणि अर्ध्या तासाने धुआ.
या जेलीचा शू-शायनर म्हणूनही वापर करता येईल.
आरशावर ओरखडे आले असल्यास त्यावर पेट्रोलियम जेली लावा आणि कागदाने घासा.