भाऊबीजेला भावाला औक्षण करताना पुजेच्या ताटात 'या' वस्तू जरुर ठेवा

| Sakal

भाऊबीजेला बहिण भावाला औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते.

| Sakal

औक्षणावेळी पुजेच्या ताटात विशेष महत्वाच्या या गोष्टी असायलाच हव्यात

| Sakal

कुंकू :

कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे दिर्घायु सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

| Sakal

हळद :

हळद आणि कुंकू हे सौख्य- समृध्दीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पुजेच्या ताटात कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी.

| Sakal

अक्षता :

दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या.

| Sakal

नाण- सोनं- सुपारी :

धन-धान्य समृध्दीचे प्रतीक अन् इडा-पिडा टळावी यासाठी भावाच्या कपाळी कुंकूवाचा टिळा लावल्यानंतर नाण- सोनं- सुपारीने औक्षण करावे.

| Sakal

नारळ :

भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी औक्षणाच्या ताटात श्रीफळ (नारळ) जरुर ठेवावे.

| Sakal

दिवा :

वाईट शक्तींपासून भावाचे रक्षण व्हावे यासाठी ओवाळणीच्या ताटात दिवा असणं महत्त्वाचं आहे.

| Sakal

मिठाई :

बहिण-भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्व आहे.

| Sakal