सकाळचा नाश्ता करा हेल्दी, ट्राय करा टेस्टी शेवयांचा उपमा

| Sakal

शेवयांचा उपमा हा हेल्दी नाश्ता म्हणून ओळखला जातो.

| Sakal

तुम्हाला हा बनवणं देखील अतिशय सोपं आहे. अगदी कमी वेळात तुम्ही हा टेस्टी नाश्ता बनवू शकता. चला तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

| Sakal

साहित्य – शेवया, कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ, फोडणीचं साहित्य

| Sakal

एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा. त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा.

| Sakal

शेवया शिजल्या की त्यातून पाणी काढून टाका.

| Sakal

नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा.

| Sakal

मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला. वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या.

| Sakal

त्यात थोडं पाणी घालून नीट शिजवून घ्या. वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. तुमचा उपमा तयार होणार.

| Sakal