Gree tea पिताय? मग या चुका नक्की टाळा, नाहीतर...

Aishwarya Musale

वजन कमी होते

वजन झपाट्याने कमी करायचे असेल, त्वचा चमकदार करायची असेल, पचनक्रिया सुधारायची असेल किंवा शरीरात ऊर्जेची गरज असेल तर ग्रीन टी चे सेवन आपल्या मनात सर्वात आधी येते.

green tea | sakal

ग्रीन टीचे फायदे

हा एक चहा आहे ज्याचे अनेक छुपे फायदे आहेत. आजकाल जगभरात ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त झाली आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीही ग्रीन टी प्रभावी आहे.

green tea | sakal

या चुका करू नका

कर्करोग, कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयरोगातही हे फायदेशीर आहे. परंतु काही लोकांना ग्रीन टी चे सेवन करण्याची योग्य पद्धत माहित नसते आणि ते पिताना काही चुका होतात.

green tea | sakal

कधी प्यायची ग्रीन टी

काही लोक ग्रीन टीचे अतिसेवन करू लागतात. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच ग्रीन टी प्या. जर आपण ग्रीन टीचे जास्त सेवन केले तर यामुळे चिंता, निद्रानाश आणि पाचन समस्या उद्भवू शकतात.

green tea | sakal

रात्री ग्रीन टीचे सेवन करणे टाळा

ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असते, म्हणून जर आपण रात्री त्याचे सेवन केले तर त्याचा झोपेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्री ग्रीन टीचे सेवन करणे टाळावे. झोपण्यापूर्वी कधीही याचे सेवन करू नका.

green tea | sakal

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळा

काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते. अशावेळी ते लोक ग्रीन टी घेतात. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर ही चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरेल.

green tea | sakal

जेवणानंतर ग्रीन टी पिणे टाळा

जेवणानंतर लगेच पिऊ नका जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच ग्रीन टी पिण्याची चूक करत असाल तर ती दुरुस्त करा. कारण यामुळे अन्नातून पोषक द्रव्ये मिळण्यात अडथळा निर्माण होतो.

green tea | sakal

अशक्तपणा येतो

जेवणानंतर लगेचच त्याचे सेवन लोह शोषणात अडथळा आणते, ज्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो. अन्न खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी तुम्ही आरामात ग्रीन टी पिऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

green tea | sakal