RBI: 500 रुपयांच्या नोटेमुळे, RBIचं टेन्शन वाढलं! कारण

| Sakal

2000 रुपयांच्या नोटा बंद

19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. आता आरबीआयच्या वार्षिक अहवालात 500 रुपयांच्या नोटांबाबतही मोठा खुलासा झाला आहे.

| Sakal

30 सप्टेंबरची मुदत

2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिलेली 30 सप्टेंबरची मुदत संपण्यापूर्वीच 500 रुपयांच्या नोटांशी संबंधित ही अडचण मध्यवर्ती बँकेसमोर आली आहे.

| Sakal

500 च्या नोटांची घुसखोरी

अहवालानुसार, बनावट 500 च्या नोटांची घुसखोरी सातत्याने वाढत आहे. 2022-23 मध्ये 500 रुपयांच्या सुमारे 91 हजार 110 बनावट नोटा पकडण्यात आल्या, जे 2021-22 च्या तुलनेत 14.6 टक्क्यांनी जास्त आहेत.

| Sakal

बनावट नोटा

2020-21 मध्ये 500 रुपयांच्या 39,453 बनावट नोटा पकडण्यात आल्या. तर 2021-22 मध्ये 76 हजार 669 किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.

| Sakal

500 रुपयांच्या नोटांसोबतच बनावट चलन जप्त करण्याच्या प्रकरणांमध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटांचाही समावेश आहे.

| Sakal

20 रुपयांच्या बनावट नोट

500 रुपयांव्यतिरिक्त 20 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाणही वाढले आहे. 2022-23 मध्ये 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के वाढ झाली आहे. 10 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 11.6 टक्क्यांनी घट झाली आहे.

| Sakal

10 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत देशातील एकूण चलनापैकी 37.9 टक्के चलन 500 च्या नोटांचे आहे.

| Sakal

RBIचं टेन्शन वाढलं

यानंतर 10 रुपयांच्या नोटेचा वाटा 19.2 टक्के आहे. अशा परिस्थितीत 500 रुपयांच्या बनावट नोटा प्रणालीतून साफ ​​करणे ही आरबीआयची मोठी जबाबदारी आहे.

| Sakal