अखेर जिल्ह्यांना मिळाले हक्काचे पालकमंत्री

| Sakal

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

| Sakal

भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळाले आहे.

| Sakal

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे.

| Sakal

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना धुळे,लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे.

| Sakal

शिंदे गटाचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे गुलाबराव पाटील यांना बुलढाण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

| Sakal

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना हिंगोली जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

| Sakal

शिंदे गटाचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागली आहे. त्यांना सातारा आणि ठाणे या दोन जिल्ह्यांची पालकमंत्री करण्यात आले आहे.

| Sakal

भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आलं आहे.

| Sakal