शिजवलेले पदार्थ असो किंवा न शिजवलेले जास्तकाळ टिकावे म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो.
पण ते पदार्थ किती काळ ठेवावे याचीही मर्यादा असते. नाहीतर त्यात टॉक्सिन्स तयार होतात.
प्रत्येक पदार्थाची एक्स्पायरी डेट असते. त्यानुसार त्या त्या काळात पदार्थ वापरले जाणे आवश्यक असतात, नाहीतर ते खराब होतात.
चीज, पनीर, बटर सारखे दुग्धजन्य पदार्थ फ्रिजमध्ये फार काळ टिकत नाही. ते लवकर संपवणे आवश्यक असते.
लोणच्या सारखे आंबट पदार्थ आपण रोज फ्रिजमधून काढून परत ठेवतो. अशा रोजच्या काढण्याने ते लवकर खराब होतात.
सॉस, चटणी, पॅकेट फूड, मसाले हे जास्तीत जास्त ६ महिने टिकतात. त्यामुळे फ्रीजमधून वस्तून काढून खाताना पहिले एक्स्पायरी चेक करा.
चिकन किंवा मटणाचा रस्सा तुम्ही जास्तीत जास्त ४ दिवस फ्रिजमध्ये ठेवून खाऊ शकतात.
घरी बनवलेली चटणी, सॉस फ्रिजमध्ये फार काळ ठेवल्याने ते खराब होतात. विकतच्या वस्तूंप्रमाणे यात प्रिझर्वेटीव्ह घातलेले नसल्याने लवकर संपवावे.
खाऊन किंवा उघडलेले ठेवलेले फूड पॅकेट्स, पेस्ट्री, केक टेट्रा पॅक जूस हे परत फ्रिजमध्ये फार काळ ठेवल्याने ते खराब होतात.