नरेंद्र मोदींचे अमित शाहा सर्वाधिक विश्वासू नेते आहे. मोदी आणि शहा यांच्यातील मैत्री 20 वर्ष जुनी आहे. दोघेही आरएसएसच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोन नेत्यांमधील मैत्रीचे बंध सर्वांनाच माहीत आहेत. दोघांनी एकाच वेळी राजकारणात प्रवेश केला आणि एकत्र राजकीय संघर्ष सुरू ठेवला.
बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग निराळे असले तरी त्या दोघांनी आपली मैत्री कठीण काळातही टिकवल्याचे काही किस्से शरद पवार यांनी वारंवार सांगितले आहेत.
दोघे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी एकमेकांचे मैत्रीचे धागे एकदम घट्ट आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-समाजवादी पक्षाची युती अपयशी ठरली असली तरी यांच्या मैत्री तशीच घट्ट आहे.
राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख,महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री होती. 1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले होते.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची दोस्ती महाराष्ट्राला माहित आहे. या मैत्रीचा फायदा मुंडे यांना मंत्री पदासाठी झाल्याची चर्चा आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहणारा माणूस म्हणजे त्यांचे दीर्घकाळचे मित्र मनीष सिसोदिया.