येत्या १ एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि विविध वस्तू विकत घेण्याबाबतच्या नियमांत मोठे बदल होणार आहे.
आता सोन्याचे दागिने तेव्हाच विकले जातिल जेव्हा त्यावर 6-Digit Alphanumeric Hallmarking ID असेल. हा नियम सर्व हॉलोमार्क दागिन्यांसाठी अनिवार्य असेल.
सोन्याशी भारतीयांचं भावनिक नातं आहे. मात्र १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर ६ आकड्यांचा HUID किंवा Hallmark Identification number गरजेचा असेल.
याआधी 4 Digit Hallmark ID ने विक्रेते सोन्याचे दागिने देशात विकू शकत होते.
मात्र या 6 Digit Alphanumeric Gold HUID च्या मदतीने ज्वेलरी किंवा सोन्याच्या वस्तू ट्रॅक करता येणार आहे. तसेच याचा एक्सेस हॉलमार्किंग सेंटरकडेही असणार आहे.
सोन्याचे दागिने विकत घेण्याआधी ग्राहकांना त्यांचा ६ आकड्यांचा HUID नंबर BIS Care App च्या मदतीने Bureau Of Indian Standards नुसार दांगिन्यांना द्यावा लागेल.
BIS Care App तुम्हाला दागिने विकत घेण्याआधी सगळ्या डिटेल्स देईल. जसे की कोणत्या ज्वेलरने याला हॉलोमार्कदिलाय, रजिस्ट्रेशन नंबर, दागिन्याचा प्रकार आणि सोन्याची शुद्धता.
हा नवा नियम देशातील जवळजवळ ३०० जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे. Ministry Of Consumer Affair च्या मते, ३३९ जिल्ह्यांसाठी एकच हॉलोमार्क सेंटर असणार आहे.
हे नवे नियम बघून तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, ज्या ग्राहकांजवळ आधीच 4 Digit Hallmarked Gold Jewellery आहे त्यांच्या बाबतीत हा नवा नियम बंधनकारक नसेल.
वर्ष २००० पासून भारतात ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हॉलोमार्किंगला सुरुवात झाली. सध्या ३ लाख सोन्याच्या दागिन्यांवर ६ अंकी हॉलोमार्किंग आकडे नोंदवण्यात आले आहेत.