Hair Care : घरीच दूधाने करा केस स्ट्रेट

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा मुली केस स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनर नाहीतर केरेटीन वापरतात. त्यामुळे केस सहज सरळ होतात.

जास्त हेअर स्ट्रेटनर किंवा केरेटीन वारल्याने केस सरळ होतात पण केसांना नुकसानही पोहचते.

जर तुम्हाला नैसर्गिकरित्या केस सरळ करायचे असतील तर काही घरगुती उपाय करून बघा. ज्यामुळे केस सरळ व हेल्दी होतील.

दूधात कॅल्शियम, प्रोटीन भरपूर असतात. त्यामुळे केस काळे, दाट आणि मऊ होतात. दूध नॅचरस स्ट्रेटनर आहे. ं

दूधात लिंबाचा रस मिक्स करा आणि फ्रीजमध्ये गोठवण्यासाठी ठेवा. मिश्रण सेट झाल्यावर त्यात केळी आणि मध मिक्स करा. पेस्ट बनवा.

उत्तम परिणामांसाठी मूळापासून टोकापर्यंत नीट लावा.

नंतर जाड कंगवा फिरवून केस मोकळे करा. म्हणजे सगळीकडे पॅक नीट लागेल.

पेस्ट लावल्यावर केस सेट होऊ द्या. नंतर एकतर केस मोकळे सोडा किंवा झाकून ठेवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.