450 वर्ष जुन्या महालात हंसिका घेणार सात फेरे!

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये जवळपास एक दशकाहून अधिक काळ काम करत असलेली हंसिका मोटवानी सध्या तिच्या लग्नाविषयीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

Esakal

बातमी आहे की हंसिका यावर्षात डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

Esakal

सर्वात अधिक चर्चा रंगलीय ती हंसिकाच्या लग्नस्थळाची. बोललं जात आहे बॉलीवूडमधलं आणखी एक ग्रॅंड वेडिंग म्हणून याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं.

Esakal

'कोई मिल गया' फेम हंसिका मोटवानी राजस्थानमधील ४५० वर्ष जुन्या प्रसिद्ध महालात लग्न करणार आहे. महाल लग्नासाठी बूक करण्यात आला आहे,आणि लग्नाची तयारी देखील सुरु झाली आहे.

Esakal

हंसिकानं मात्र अद्याप अधिकृतपणे याविषयी भाष्य केलेलं नाही. राजस्थान मध्ये असलेल्या ज्या महालात हंसिका लग्न करणार आहे त्याचं नाव आहे,'मुंडोता फोर्ट अॅन्ड पॅलेस'

Esakal

'मुंडोता फोर्ट अॅन्ड पॅलेस' जयपूरमधील लग्झरी व्हेन्यू पैकी एक असल्याचं बोललं जात आहे

Esakal

हंसिका कोणाशी अन् किती तारखेला लग्न करतेय हे मात्र गुलदस्त्यातच आहे. पण बोललं जात आहे हंसिका कोणा राजकीय नेत्याच्या बिझनेसमन मुलाशी लग्नबंधनत अडकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal