'त्या' मुलाखतीआधी ढसाढसा रडलेली प्रिया...

प्रणाली मोरे

प्रिया बापट आज १८ सप्टेंबर रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयीचा एक आठवणीतला किस्सा इथे शेअर करत आहे.

Esakal

प्रिया बापटचा 'टाइमप्लीज' हा सिनेमा लोकांना आवडला होता. सिनेमात उमेश कामत अर्थात प्रियाचा खऱ्या आयुष्यातील नवरा मुख्य भूमिकेत होता. सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकरही सिनेमात होते.

Esakal

या 'टाइमप्लीज' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं प्रिया आपल्या टीमसोबत एका वाहिनीच्या कार्यालयात गेली होती.

Esakal

उमेश कामत मात्र त्यादिवशी थोडा ताप असल्यानं उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे प्रिया,सई आणि सिद्धार्थ हजर होते. मुलाखत सुरु होणार इतक्यात...

Esakal

प्रियाचा फोन खणखणला..समोरुन उमेश बोलत होता. त्यानं फक्त 'मुलाखत सुरु झाली का?' असं विचारलं प्रियाला.

Esakal

पण बायकोच ती पटकन तिनं 'ताप आहे का तुला?' असं विचारलं आणि उमेश म्हणाला 'हो,थोडा वाढलाय. आराम करेन बरं वाटेल', असं म्हणाला.

Esakal

पण हे ऐकल्यावर प्रियानं ढसाढसा रडून,त्यानंतर थोडं तिथल्या प्रॉडक्शनवाल्यांवर राग काढून जी काही तारांबळ उडवून दिली होती ती आजही लख्ख लक्षात आहे. अर्थात हे तिचं उमेशवरचं प्रेम होतं .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal