कोणाच्या नावाचं सिंदुर लावतात रेखा? वाचा Unknown Facts

प्रणाली मोरे

१० ऑक्टोबर,१९५४ चा जन्म असलेल्या रेखा ६८ वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या सिनेमांप्रमाणेच त्यांचं वादग्रस्त आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं.

Esakal

वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना 'अंजाना सफर' सिनेमासाठी पहिला किसिंग सीन द्यावा लागला, ज्याची त्यांना कल्पनाच दिलेली नव्हती. अभिनेत्यानं त्यांना जबरदस्तीनं तब्बल ५ मिनिटं किस केलं.

Esakal

विनोद मेहरा यांच्यासोबतचं रेखाचं लग्नही खूप चर्चेत राहिलं. विनोद मेहरा यांच्या आईनं रेखा यांचे स्वागत चप्पलनं केलं होतं. तसंच,त्यांना घरात गृहप्रवेशही करू दिला नव्हता.

Esakal

रेखा आजही भांगेत सिंदुर का भरतात याचं उत्तर गुलदस्त्यातच आहे. यावरनं गेल्या अनेक वर्षांपासून वाद रंगतोय. त्या कोणाच्या नावाचं सिंदुर लावतात हे लोकांना जाणून घ्यायचं आहे.

Esakal

नीतू कपूर आणि Rishi कपूर यांच्या लग्नात रेखा सिंदुर लावून आल्या होत्या. त्यांनी मंगळसूत्रही घातलं होतं पण ते पाहून सगळे हैराण झाले होते. कारण रेखाचे पती त्यावेळी हयात नव्हते.

Esakal

अभिनेते पुनित इस्सर यांच्या पत्नीनं रेखा अमिताभच्या नावाचं सिंदुर लावते असं म्हटलं होतं तेव्हा खूप वाद झाला होता. तेव्हा रेखा यांनी आमच्यात फॅशन म्हणून सिंदुर लावतात असं म्हटलेलं.

Esakal

रेखा २००८ च्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, ''मला लोकांच्या प्रतिक्रियांनी काहीच फरक पडत नाही. मला वाटतं,सिंदुर लावलं की मी सुंदर दिसते,आणि ते माझ्यावर छान उठून दिसतं''.

Esakal

रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी लग्नाच्या १ वर्षानंतर आत्महत्या केली होती. रेखाच्याच ओढणीनं त्यांनी गळफास घेतला होता.

Esakal

अनेक अभिनेत्यांसोबत रेखा यांचे नाव जोडले गेले.अमिताभ व्यतिरिक्त नवीन निश्चल,विश्वजीत,जितेंद्र,शत्रुघ्न सिन्हा,विनोद मेहरा,संजय दत्त,अक्षय कुमार यांच्याोबतही रेखाचं नावं जोडलं गेलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal