जास्वंदीच्या फुलामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केस गळणे थांबते. तसेच केस निरोगी आणि चमकदार दिसते.
तुमचे केस कमकुवत असतील किंवा गळत असतील तर शॅम्पूऐवजी बेसन आणि जास्वंदीची पावडर पाण्यात मिक्स करून वापरा. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतील.
हेअरफॉल खूप होत असेल तक जास्वंदीचे फूल बारीक करून त्याचा रस काढा. हा रस आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांना लावा. केस गळणे थांबेल.
जास्वदींच्या पावडरमध्ये ३-४ चमचे लिंबाचा रस मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा त्याने डँड्रफ दूर होतो.
जास्वंदीच्या फुलांची पेस्ट डोक्याला लावल्याने केस गळतीची समस्या कमी होते. केसांची वाढही चांगली होते.
केसांना या फुलांचा हेअरमास्क लावल्याने केस दाट आणि काळे होतात.
जास्वंदीचे फूल टक्कल पडण्यापासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जास्वंदीचे फूल आणि पाने बारीक करून प्रभावित भागावर लावल्याने टक्कल पडलेल्या ठिकाणी केस उगवतात.