Holi Astrology : होळीला 'हे' उपाय केल्याने पडेल पैशाचा पाऊस...

| Sakal

ज्योतिषशास्त्रात होळाच्या दिवशी करण्याचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे घरात पैसा, सुख, समृद्धी येऊ शकते.

| Sakal

कोरडं नारळ, काळे तीळ, लवंग आपल्या डोळ्यावरून फिरून होळीमध्ये अर्पण करावे. त्यामुळे मानसिक समस्यांमधून मुक्तता मिळते.

| Sakal

जर कोणाला दीर्घ काळापासून एखादा आजार असेल तर होळीच्या राखेने त्यांना टिळा लावा. शारीरिक व्याधीतून मुक्तता होते.

| Sakal

जर कोणाला ग्रहदोष असेल तर त्यांनी होळीच्या राखेचे भस्म शंकराच्या पिंडीवर व्हावे. ते भस्म पाण्यात मिक्स करून त्याने आंघोळ करावी, ग्रहदोष दूर होतो.

| Sakal

होळीच्या दिवशी मुख्य दाराच्या उंबऱ्यावर थोडा गुलाल टाकावा, दोन मुखी दिवा दाराच्या दोन्ही बाजूला लावावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

| Sakal

होळीला देवी लक्ष्मीची फुलं, गुलाल वाहून विधीवत पूजा करावी. देवीची कृपा प्राप्त होते.

| Sakal

आर्थिक समस्येतून जात असाल तर होळीत अर्पण करायच्या कोरड्या नारळात भूसा भरून अर्पण करावे. त्यामुळे समस्या दूर होते.

| Sakal

होळीची राख घरी आणून त्यात मोहरी मिक्स करा. एका स्वच्छ भांड्यात भरून घरातल्या पवित्र जागी ठेवा. घरातली नकारात्मकता निघून जाईल.

| Sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

| Sakal