डोक्यावर २.६ लाख कोटीचं कर्ज, तरीही अदानी जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती कसे?

| Sakal

उद्योगपती गौतम अदानी सध्या जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानींची मालमत्ता सध्या १२ लाख कोटींच्या आसपास आहे.

| Sakal

मात्र अदानी समूहाचं कर्ज वाढलं आहे.

| Sakal

या समूहाचं कर्ज २.२ लाख कोटी रुपयांवरुन २.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. पण मग त्यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती कशी काय?

| Sakal

अब्जाधीश उद्योगपतींची संपत्ती मोजताना त्यांच्याकडचं शेअर्सचं मूल्यही मोजलं जातं. त्यामुळे शेअर्सच्या किमती वाढल्या तर अदानींची मालमत्ताही वाढणार आहे.

| Sakal

अदानी यांची खरी संपत्ती कंपन्यांच्या महसुलातून नाही. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स घसरले तर अदानींची संपत्तीही कमी होईल.

| Sakal

गेल्या २ वर्षांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये ११०० टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत सेन्सेक्स केवळ ४० टक्क्यांनी वाढला आहे.

| Sakal

या यादीमध्ये टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत.

| Sakal

तर फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

| Sakal