निरोगी शरीरासाठी, आपण किमान 7 ते 9 तासांची झोप पूर्ण करणे आवश्यक आहे.
झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर शरीरात आळस राहतो, तर मन कामात गुंतत नाही.
पण एखादी व्यक्ती झोपल्याशिवाय किती काळ जगू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
निरोगी शरीरासाठी अन्न, पाणी आणि हवा त्याचप्रमाणे चांगली झोप घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आयोजित केलेल्या स्पर्धेत 18 दिवस 21 तास 40 मिनिटे सतत झोप न घेण्याचा विक्रम नोंदवण्यात आला.
पण यामुळे शरीरावर अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम दिसून आले.
झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते.
डोकेदुखी, स्नायूंना थकवा जाणवतो. वजन वाढू लागते.
उच्च रक्तदाबाची समस्याही निर्माण होते, तसंच शरीराचं संतुलन बिघडतं.