उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं असा सल्ला अनेकजण देत असतात.
जर पाणी योग्य प्रमाणात घेतले नाही तर डिहायड्रेशन होतं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होते.
तज्ज्ञांच्या मते साधारण दिवसातून किमान २ ते २.५ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे
उन्हाळ्यात किमान २.५ ते ३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे
योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणार नाही
पाणी जास्त पिल्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे तापमान व्यवस्थित राहते
त्याचबरोबर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत होते