Bharli Vangi : रविवार स्पेशल ! अशी करा महाराष्ट्रीयन स्टाईल भरली वांगी

| Sakal

महाराष्ट्रीयन भरली वांगी म्हटलं तर तोंडाला पाणी सुटणारचं.

| Sakal

जर तुम्ही भरली वांगी बनविण्याचा बेत आखत असाल तर ही रेसिपी नक्की वाचा.

| Sakal

साहित्य : १०-१२ काटेरी लहान वांगी, दोन मोठे कांदे, दोन टेबलस्पून सुकं खोबरं, दोन टेबलस्पून तीळ, दोन टेबलस्पून दाण्यांचं कूट, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप ओलं खोबरं

| Sakal

या सोबतच दोन चमचे धनेपूड, एक चमचा टेबलस्पून सोया जिरेपूड, एक टेबलस्पून काळा मसाला, तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ आणि चिंचेचा कोळ

| Sakal

वांग्यांना चीर पाडून पाण्यात घाला. एक कांदा चिरून व सुकं खोबरं भाजून घ्या.

| Sakal

तीळ भाजून कूट करा. सर्व साहित्य एकत्र करा. त्यात सोया कांदा किसून एकत्र करा.

| Sakal

ओलं खोबरं, कोथिंबीर इत्यादी सर्व एकत्र करून वांग्यात भरा. तेलाची खमंग फोडणी बनवून दोन डाव फोडणी बाजूला काढा. फोडणीत भरली वांगी घाला.

| Sakal

झाकणावर पाणी घालून शिजवा. वाढण्यापूर्वी ठेवलेली फोडणी व कोथिंबीर पेरून वाढा.

| Sakal