Clean Eyeglasses : चष्मा स्क्रॅचमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स

| Sakal

ज्यांना अगदीच चष्म्याशिवाय दिसत नाही त्यांना नेहमी चष्मा लावावा लागतो. तरीही अनेकांना ते स्वच्छ करण्याची योग्य पद्धत माहीत नसते.

| Sakal

सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते.

| Sakal

चष्म्यावरील धूळ स्वच्छ करा

चष्मा नळाखाली पकडून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकावे. त्यानंतर हलक्या हाताने चष्म्याच्या काचा आणि त्याच्या आजूबाजूची फ्रेम स्वच्छ करावी.

| Sakal

सॅनिटायझरचा वापर

चष्म्यावर सॅनिटाइजर टाकून ठेवू नका. सॅनिटायजर लावून चष्मा लगेचच कोरडा करून घ्यावा नाहीतर लेन्सवर डाग राहण्याची शक्यता असते.

| Sakal

लिक्वीड सोप

चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचे काही थेंब बोटांवर घेऊन हलक्या हाताने लेन्स स्वच्छ करा.

| Sakal

मायक्रोफायबर कापड

मायक्रोफायबर कापड हे लिंट फ्री असते, त्यामुळे पुसताना लेन्सवर स्क्रॅचच्या खुणा उमटत नाहीत.

| Sakal

स्क्रॅचमुक्त कसा ठेवायचा

चष्म्याला कायमच देण्यात आलेल्या बॉक्स कव्हरमध्ये ठेवावं. वापरानंतर चष्मा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवणे टाळा.

| Sakal