उन्हाळा म्हटलं की आंबा हे समीकरण ठरलेलंच आहे.
सर्वचजण उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खातात.
पण कापल्यावर काही वेळाने आंबा काळा पडतो.
असं होऊ नये म्हणून या काही टिप्स आम्ही देत आहोत.
एका भांड्यात एक चमचा मध आणि एक ग्लास पाणी टाकून मिक्स करा.
त्यामध्ये कापलेल्या आंब्याचे तुकडे बुडवून ठेवा. मधाऐवजी साखरही वापरू शकता.
कापलेल्या आंब्याचे तुकडे झिपलॉक बॅगमध्ये टाका.
ही पिशवी फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे आंबे फ्रेश राहतील.
आंब्याचे तुकडे काही वेळ लिंबाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा.