ओठ होतील गुलाबाच्या पाकळ्या; करा 'हे' उपाय!

सकाळ डिजिटल टीम

ओठांची त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यांची नीट काळजी घेतली नाही, तर ते निस्तेज दिसू लागतात, ही त्वचा फाटते.

अशात हे ओठ गुलाबी आणि मऊ राखण्यासाठी हे नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतात.

ड्रॅगन फ्रूटचा रस आणि व्हॅसलीन एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवावं.

थंड झाल्यावर त्याचा लिपबाम तयार होईल. हा लिपबाम ओठांवर लावल्याने ओठांची त्वचा मऊ राहते.

पपईच्या रसात एक चमचा कोमट तूप टाकावं आणि हे मिश्रण मिनिटभरासाठी फ्रिजमध्ये ठेवावं.

त्यानंतर घट्ट होईपर्यंत हे मिश्रण गॅसवर उकळवावं आणि भांड्यात भरून फ्रिजमध्ये ठेवावं. हा लिपबाम आठवड्यातून दोनदा लावल्यावर ओठ फाटणार नाहीत.

डाळिंबाच्या दाण्यांचा सर काढावा. त्यात अर्धा चमचा तूप घालून हे मिश्रण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावं.

हा लिपबाम ओठाला लावल्याने ओठाला नैसर्गिकपणे लालसर गुलाबी रंग येतो. ओठही मऊ राहतात.

ओठांना आठवड्यातून एकदा स्क्रब करावं. ज्यामुळे ओठावरची डेड स्कीन निघून जाईल आणि ओठ स्वच्छ दिसतील.

ओठ फाटले असतील, त्वचा निघत असेल तर रात्री झोपण्याआधी खोबरेल तेल लावावं. लवकर फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.