हृता दुर्गुळे सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी दुबईच्या टूरवर गेली आहे.
हृता आपला पती प्रतिक शहा सोबत सध्या दुबईत एन्जॉय करतेय.
हृतानं आपल्या दुबईच्या टूरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हृतानं जसे सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. तशा चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस तिच्या फोटोवर व्हायला लागला.
सध्या चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे.. त्यामुळे सर्वच देशांना याविषयी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्यात.
हृता दुबईत फिरायला गेल्यानं चाहत्यांनी आता चिंता व्यक्त केली आहे.
चाहते हृताला म्हणत आहेत की, 'अगं जगभरात कोरोनाचा धोका सुरु झाल्याचे संकेत दिले गेलेयत आणि तू फिरायला का गेलीयस..?