विविधतेने नटलेल्या आपल्या देशात कित्येक सुंदर गावं आहेत. अशाच काही गावांचे फोटो कलर्स ऑफ भारत या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आले आहेत.
लोकप्रिय उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ही ट्विटर थ्रेड शेअर केली आहे. याला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.
मेघालयताली मॉलीन्नॉंग नावाच्या गावातील हा फोटो आहे.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यात असणाऱ्या कोल्लेनगोडे गावातील हा फोटो आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारीजवळ असणाऱ्या मथूर गावातील हे सुंदर दृश्य आहे. ड्रोनच्या मदतीने हा फोटो घेतला आहे.
कर्नाटकातील वारंगा गावातील हा फोटो आहे.
दार्जिलिंगमधील गोरखे खोला गावातील हा सुंदर फोटो आहे.
ओडिशा राज्यातील जिरांग गावातील हा फोटो आहे.
अरुणाचलमध्ये असणाऱ्या झिरो गावातील हा फोटो आहे.
उत्तराखंडमधील माना गावातील हा फोटो आहे. या गावाला भारतातील शेवटचं गाव म्हणूनही ओळखलं जातं.
राजस्थानातील खिमसार गावातील हा फोटो आहे. वाळवंटाच्या मध्येच एक सुंदर तळं यात दिसतंय.