महिला टी २० विश्वकपादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलीया यांच्यात सेमीफायनल सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळण्यात येणार आहे.
भारतीय संघ ग्रुप बी मध्ये चार पैकी तीन सामने जींकून दुसऱ्या स्थानावर आहे.ग्रुप ए मध्ये भारताने चारही सामने जिंकले आहेत.
सेमीफायनलमध्ये जर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात जिंकायचे असेल तर भारताला खेळाचा स्तर उंचावणे गरजेचे आहे.
स्मृती मंधानाने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. तीन सामन्यात तिच्या १४९ धावा झाल्या असून तिच्यावर भारतीयांच्या अपेक्षा असतील.
कर्णधार हरमनप्रीत कौर या स्पर्धेत फार काही करु शकलेली नाहीये, सेमिफायनलमध्ये तिच्या खेळाकडे देखील लक्ष असेल.
ऋचा घोषने पाक विरोधात ३१ तर वेस्ट इंडीज ४४ आणि इंग्लडविरोधात ४७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरोधात तिच्याकडून देखील अपेक्षा आहेत.
जेमिया रोड्रिग्ज ने पाक विरोधात ५३ धावा केल्या होत्या आगामी सामन्यात तिच्यावर देखील लक्ष असेल.
गोलंदाजीमध्ये रेणूका ठाकूरकडे सर्वांचे लक्ष असेल, तिने चार सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत.