Tea Day : एक चुस्की चाय की.., चहाचे एवढेप्रकार माहितीयेत का?

सकाळ डिजिटल टीम

सीटीसी चहा म्हणजे आपण रोज पितो तो चहा.

Tea Day | esakal

ग्रीन टी ला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंट जास्त असतात.

Tea Day | esakal

ग्रीन टीत तुळस, अश्व गंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात एक किंवा तीन चार हर्ब एकत्र करूनही घातले जातात.

Tea Day | esakal

ऑर्गेनिक टी. ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, त्याला ऑर्गेनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात.

Tea Day | esakal

व्हाईट टी. हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या चहाच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो.

Tea Day | esakal

ब्लॅक टी. कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की, त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो.

Tea Day | esakal

लेमन टी. लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो. कारण चहाचे जे अँटी ऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Day | esakal