IPL 2023 : लक्षवेधी ठरणार हे 5 खेळाडू!

अनिरुद्ध संकपाळ

सॅम करन :

आयपीएल इतिहासात सर्वाधिक 18.5 कोटी बोली लागलेल्या सॅम करनवर सर्वांच लक्ष असणार आहे. आता तो सीएसकेकडून नाही तर पंजाब किंग्जकडून खेळणार आहे.

विराट कोहली :

विराट कोहली आता आरसीबीचा कर्णधार नाही. मात्र गेल्या हंगामात बॅड पॅचमध्ये असलेला विराट आता फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात विराट आरसीबीला पहिल्या वहिल्या विजेतेपदापर्यंत पोहचवणार का याची उत्सुकता आहे.

कॅमरून ग्रीन :

मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनला आपल्या संघात घेतले आहे. कॅमरून ग्रीन हा पोलार्डची जागा घेणार का याबाबत मुंबईच्या चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. त्याच्यावर मुंबईने 17.50 कोटींची बोली लावली आहे.

निकोलस पुरन :

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार निकोलस पूरनला लखनौ सुपर जायंट्सने 16 कोटी रूपयाला खरेदी केली आहे. मध्यंतरी त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. मात्र आता फिनिशर म्हणून लखनौकडून तो यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करतो हे पहावे लागेल.

सूर्यकुमार यादव :

भारतीय टी 20 संघाचा सर्वात ग्लॅमरस फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवने आपली ओळख निर्माण केली आहे. आता मुंबई इंडियन्सकडून पुन्हा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची फलंदाजी डोळ्याचे पारणे फेडणारी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.