करुन करुन भागली आणि देवपुजेला लागली...

| Sakal

असं म्हणतात,लोकांवर कठीण प्रसंग आले की त्यांना देव आठवतो. ते धार्मिक होतात. मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये फसलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या बाबतीतही आता काहीसं तसंच झालं आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भल्यासाठी,यशासाठी गुरुंचा सल्ला घेतात. तसंच, आता जॅकलिनही म्हणे गुरुजी निर्मल सिंग यांची शिष्या बनली आहे. एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार जॅकलिन गुरु निर्मल सिंग यांच्या आश्रमात गेली होती.

| Sakal

गुरु निर्मल सिंग अनेक बड्या लोकांचे तारणहार आहेत असं मानलं जातं. बोललं जात आहे की जॅकलिननेही निर्मल सिंग गुरुजींचं दर्शन घेतलं आणि त्यांनी स्थापित केलेल्या शिव मंदीराला देखील भेट दिली.

| Sakal

जॅकलिन आजकाल निर्मल सिंग गुरुजींचा दिवसातून एकवेळा गुरुमंत्राचा जप करते,इतकंच नाही तर तिनं म्हणे त्यांनी दिलेले ब्रेसलेटही हातात घातल्याचं समोर आलं आहे.

| Sakal

बॉलीवूडमधील अनेक कुटुंबांची गुरुजी निर्मल सिंग यांच्यावर श्रद्धा आहे. जॅकलिनच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की,जॅकलिनला तिच्या जवळच्या कुणीतरी गुरुजींनी बांधलेल्या शिव मंदीराला भेट देऊन आशीर्वाद घेण्याचा आणि छतरपुर येथील गुरुजींच्या आश्रमात जाण्याचा सल्ला दिला होता.

| Sakal

जॅकलीन आता कुठलाही ड्रेस घातला असला तरी त्यावर गुरुजींनी दिलेलं ते ब्रेसलेट हातात घालताना दिसते.

| Sakal

ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग केसप्रकरणातील आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडीसचे नाव सामिल आहे. तेव्हापासून अभिनेत्री मोठ्या संकटात सापडल्याचं समोर आलं आहे. जॅकलिनने यासंदर्भात आपली साक्ष नोंदवताना,'माझी संपत्ती,मी कमावलेली' असं स्पष्ट म्हटलेलं आहे.

| Sakal