जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांची भक्त चंदा दिसते. चंदाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री विजया बाबर
विजया केवळ २३ वर्षांची असून ऑक्टोबर १९९९ मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला
इतक्या लहान वयात जय जय स्वामी समर्थ मालिकेतील चंदा या भूमिकेमुळे तिला कमालीची लोकप्रियता मिळाली
विजयाचे कधी साडीतले तर कधी मॉडर्न लूक मधले फोटो तिच्या फॅन्सना प्रेमात पाडणारे आहेत
विजया पनवेलच्या पिल्लई कॉलेजची. कॉलेजमध्ये असताना विजयाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला
विजयाच्या शिकस्त ए इश्क हे प्रायोगिक नाटक पाहायला मालिकेचे कार्यकारी निर्माते महेश बोगाटे उपस्थित होते
महेश बोगाटे यांना विजयाचा अभिनय आवडला आणि त्यांनी तिला जय जय स्वामी समर्थ मालिकेत काम करायची संधी दिली.
विजयाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि विजया साकारत असलेली चंदा आज प्रेक्षकांच्या मनामनात बसली आहे