Jasprit Bumrah : बुमराहचं नसणं न परवडणारं?

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय टी 20 संघाला वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच दुखापतींनी ग्रासले आहे.

आशिया कपवेळी रविंद्र जडेजाला दुखापत झाली अन् तो टी 20 वर्ल्डकपला मुकला.

या धक्क्यातून सावरतोय न सोवरतोय तोच भारताचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीने उचल खालली अन् तोही वर्ल्डकपच्या संघातून बाहेर पडला.

अक्षर पटेलच्या रूपात जडेजाची रिप्लेसमेंट आपल्याला मिळाली. मात्र जसप्रीत बुमराह नसण्याने मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

डेथ ओव्हरमधील दोन षटके ही जसप्रीत बुमराहच टाकणार हे निश्चित असायचं. तो भारताचा डेथ बॉलिंग स्पेशालिस्ट आहे. त्याच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करतानाच्या भारताच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या.

जर सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाच तर ते षटक टाकणारा आपला हुकमी एक्का जसप्रीत बुमराह असायचा. मात्र आता भारतीय कर्णधाराला पर्याय शोधावा लागणार आहे. तो पर्याय बुमराह इतकाच यशस्वी होईल की नाही हे देखील काळच ठरवेल.

जसप्रीत बुमराह हा असा गोलंदाज होता जो परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल तो भेदक माराच करायचा. टीम इंडियाचा तो ऑल सिजन गोलंदाज होता.

बुमराह कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्याची क्षमता ठेवत असला तरी त्याच्यासाठी ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या म्हणजे सोने पे सुहागा अशाच होत्या. त्याने ऑस्ट्रेलियात 6 टी 20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. 23 धावात 3 विकेट्स हे त्याची ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.