Jhulan Goswami : विकेट्स, वेग अन् वयाच्या बाबतीतही झुलन अव्वल

| Sakal

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे.

| Sakal

भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची ही शेवटची मालिका आहे.

| Sakal

भारतीय संघ देखील आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूला मालिका जिंकून निरोप देण्यासाठी उत्सुक आहे.

| Sakal

भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सनी जिंकत आघाडी देखील घेतली आहे.

| Sakal

झुलन गोस्वामी ही जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. याचबरोबर ती भारताकडून खेळणारी सर्वात जास्त वयाची महिला क्रिकेटपटू देखील आहे.

| Sakal

झुलन गोस्वामीचे आजच्या घडीला वय हे 39 वर्षे 297 दिवस इतके आहे.

| Sakal

भारताची माजी कर्णधार मिताली राज दुसऱ्या स्थानावर आहे. तिने 39 वर्षे 114 दिवस वय असताना भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

| Sakal

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डायना एडुल्जी यांचा नंबर लागतो. त्यांनी 37 वर्ष 184 दिवस वय असताना भारताचे प्रतिनिधत्व केले होते.

| Sakal